मालवणी दारूकांड प्रकरणी गुजरातमधून एकाला अटक

June 26, 2015 9:03 PM0 commentsViews:

Image img_230822_arrest34_240x180.jpg26 जून : मालवणी विषारी दारू प्रकरणी आणखी एका आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आलीय. किशोर पटेल असं त्याचं नाव आहे. विषारी मिथेनॉल गुजरातमधून आलं होतं हे स्पष्ट झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

अटकेनंतर किशोर पटेलसह 5 जणांना न्यायलायसमोर हजर केले असता 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवणी विषारी दारूने 104 जणांचे बळी घेतल्यानंतर धडक कारवाईला सुरूवात झालीय.

पोलिसांनी अनेक हातभट्‌ट्यांवर छापे घालून अनेकांना ताब्यात घेतलंय. तर अजूनही कारवाई सुरूच आहे. या अगोदर मुख्य आरोपी आतिक खानला दिल्लीतून अटक करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close