चिक्की घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनाही वाटा मिळाला का ? -निरुपम

June 26, 2015 11:40 PM0 commentsViews:

nirupam456326 जून : चिक्की घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही 206 कोटींमधला वाटा मिळाला असेल म्हणूनच ते पंकजा मुंडेंना क्लीन चीट देण्याची घाई करत आहेत असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणीही निरुपम यांनी केली.

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात एकाच दिवशी 206 कोटींची खरेदी करण्यात आल्यामुळे खळबळ उडालीये. विरोधकांनी हा घोटाळा असल्याचा आरोप करत फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कोणताही गैरव्यवहार केला नाहीये अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केलीये. त्यामुळे विरोधकांनी आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केलाय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close