संपूर्ण अमेरिकेत समलिंगी विवाहाला कोर्टाचा हिरवा कंदील

June 27, 2015 3:40 PM0 commentsViews:

usa lgbt27 जून : अखेर अमेरिकेत समलैंगिकांच्या चळवळीला यश आलंय. आता अमेरिकेत समलिंगी संबंध आणि विवाहाला मान्यता मिळालीये. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मॅरेज एक्वॉलिटीला मान्यता देत हा ऐतिहासिक निर्णय दिला. 5 विरुद्ध 4 अशा मतांनी हा निर्णय दिला गेलाय.

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर संपूर्ण अमेरिकेत जल्लोष साजरा केला गेलाय. सरकारी इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंना सप्तरंगांनी उजळून टाकलंय. अमेरिकेतील काही राज्यांनीच याअगोदर समलिंगी संबंधांना मान्यता दिली होती. तर अनेक राज्यांनी त्यांना असंविधानिक ठरवलं होतं.

पण, अखेर सर्वांना समानतेचा हक्क आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय. या निकालानंतर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रीया येतायत.

या निर्णयामुळे अमेरिका आणखी घट्ट झालीये. आणि अखेर अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या जनतेच्या मनातील गोष्टीला आता वाव मिळालाय, अशी प्रतिक्रीया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close