पत्रकारांचं हुतात्मा चौकात धरणं आंदोलन

November 21, 2009 11:33 AM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर आयबीएन-लोकमतवर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सर्व पत्रकारांनी शनिवारी हुतात्मा चौकात धरणं आंदोलन केलं. शिवसेनेच्या गुंडगिरीविरोधात पत्रकारांनी घोषणाही दिल्या. तसेच हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली. पत्रकारांच्या धरणं आंदोलनाची गंभीर दखल घेत, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही हुतात्मा चौकात आंदोलक पत्रकारांची भेट घेतली आणि पत्रकांशी बातचीत केली. यावेळी आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केलेल्यांपैकी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहीती पाटील यांनी दिली. याचवेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा हल्ला करण्याचे आदेश त्यांना सुनील राऊत याने दिले होते. सुनील राऊत हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा भाऊ आहे. तसंच पत्रकारावरील हल्ले हे लवकरात लवकर अजामीनपात्र गुन्हे म्हणून करण्यात येतील असं आश्वासन पाटील यांनी दिलं. तसेच पत्रकारांवर झालेले हल्याचे खटले हे फास्ट ट्रक कोर्टात चालवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.

close