आनंद यादव यांचा राजीनामा मंजूर

November 21, 2009 1:42 PM0 commentsViews: 62

21नोव्हेंबर महाबळेश्वर येथे झालेल्या 82 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात होणार्‍या 83 व्या संमेलनाच्या अध्यक्षनिवडीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष द. मा. मिरासदार यांनी दिली. पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांनी मात्र यादवांच्या राजीनाम्याचं प्रकरण स्थगित असून कायदेशीर सल्ला मागितल्याचं सांगत निर्णय झाला नसल्याचं संागितलं आहे आणि संभ्रम निर्माण केला आहे.

close