नालेसफाई कंत्राटदारांविरोधात सोमैय्यांची पोलिसांत तक्रार

June 27, 2015 8:58 PM1 commentViews:

kirit somiya 43534627 जून : पहिल्याच पावसात मुंबई तुंबण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत नालेसफाईवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. आज मात्र भाजपने एक पाऊल पुढे टाकलं. भाजपचे खासदार किरीट सौमय्यांनी याबाबत कंत्राटदारांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केलीये.

किरीट सोमैय्यांनी मुंबई महापालिका कंत्राटदारांविरूद्ध मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. नालेसफाईत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप किरीट सोमैय्यानी केला असून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. तसंच कंत्राटदारांची सिंडीकेट प्रशासनासोबत बसून संगनमताने मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा टोला सोमैय्यांनी मित्र पक्षाला लगावला आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ramesh Patil

    Thanks Kiritbhai Pl expose nexus bet Contractor and BMC corporators+Officials Last you did in case of 4 G contr It’s scandal No mechanism to check whether cables are liad down properly Excavated roads and charges levied and actual receipt huge diff BMC Road Engineer who signs Permit —-1st point where capital C begins Another example Illgal MTs -Cell cos go to court and obtain stay so NO demolition.BMC is fountainhead of Corruption Last 25 yrs -ill-gotten wealth accumulated by Officers and corporators mindboggling Kiritbhai you can only dig into and culprits to book

close