पुण्यात तब्बल 80 गाड्यांची जाळपोळ, 1 संशयित ताब्यात

June 28, 2015 12:00 PM1 commentViews:

PNE VEHICLES BURNT sadas

28 जून : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड रोडवरील सनसिटी भागात तब्बल 80 गाड्यांची जाळपोळ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून त्यात आग लावताना एक जण दिसतं आहे.

निर्मल टाऊनशिप, सुर्यनगरी सोसायटी, सनसिटी, स्वामीनारायण सोसायटी, अक्षय ग्लोरी, अवधूत सोसायटी अशा वेगवेगळ्या सोसायटीमधल्या पार्किंग लॉटमध्ये असलेल्या किमान 80 ते 90 गाड्या पहाटे सुमारे 3:57 ते 4:26 या वेळेत पेटवण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ झाल्याने खळबळ माजली आहे.

या एकाच वेळी एकाच परिसरात लागलेल्या आगीमुळे अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना केल्या गेल्या. ऍसिड टाकून गाड्या पेटवण्यात आल्याचा संशय अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात याआधीही वाहनांची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्याप्रमाणात वाहनं जाळल्याची ही पहिलीच घटना आहे. या खळबळजनक घटनेमुळे सिंहगड परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण आहे.

IBN लोकमतचे सवाल

  • सोसायट्यांच्या आतल्या गाड्या जाळल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्या पेटवल्या जात असताना सोसायट्यांचे सुरक्षागार्ड काय करत होते?
  • सुरक्षागार्ड असूनही सोसायट्यांची सुरक्षा रामभरोसेच आहे का?
  • पोलिसांची रात्रीची गस्त कमी पडत आहे का?
  • हा गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे का?

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • datta maske

    puneyat gunegaryanchi sanket vaad hot ahe

close