लिबरहान आयोगाचा अहवाल फुटला : भाजपचे बडे नेते दोषी

November 23, 2009 8:06 AM0 commentsViews: 61

23 नोव्हेंबरबाबरी मशीद पाडल्याप्रकरणी चौकशी करणार्‍या लिबरहान आयोगाचा अहवाल फुटण्यावरुन सोमवारी लोकसभेत गोंधळ झाला. अहवाल संसदेत सादर होण्याअगोदरच कसा फुटला, याची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. त्यासोबतच हा अहवाल तातडीने लोकसभेत मांडण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनीही, अहवाल फुटण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लिबरहान आयोगानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दोषी ठरवल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार लिबरहान आयोगानं अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावर ठपका ठेवलाय.लिबरहान आयोगाचा हा रिपोर्ट संसदेच्या या सत्रात ठेवण्यात येणार होता. पण त्या आधीच अहवालातील माहिती बाहेर आली आहे.बाबरी मशीद पाडल्याप्रकरणाची चौकशी पूर्ण करून 30 जून रोजी अहवाल पंतप्रधानांकडं सोपवण्यात आला होता. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. यावरची प्रतिक्रिया म्हणून देशभर दंगली उसळली होती. त्यानंतर 10 दिवसांतच न्यायमूर्ती लिबरहान यांची एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला गेला होता. पण गेल्या 17 वर्षांत या आयोगाला एकूण 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. हा अहवाल तयार करण्यासाठी न्यायमूर्ती लिबरहान यांना 25 ते 30 लोक मदत करत होते. तर अहवाल तयार करण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 1 हजार पानांच्या या अहवालात 4 विभाग करण्यात आले आहेत. अहवालाच्या पहिल्या भागात अयोध्येविषयीची ऐतिहासिक आणि पौराणिक माहिती देण्यात आली आहे. तसंच रामाचं हिंदु धर्मातलं महत्त्वही विशद करण्यात आलंय. पहिल्या दोन भागांमध्ये प्रामुख्यानं भारतातील धर्माचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलंय. तिसर्‍या भागात बाबरी मशीद विध्वसांमागे कोण व्यक्ती होत्या, याचा उल्लेख करण्यात आलाय. तर शेवटच्या भागात आयोगानं जबाबदार्‍या निश्चित करण्याबरोबरच शिफारशी केल्या आहेत. अहवालात अनेक बड्या राजकीय नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. विनय कटीयार – प्रक्षोभक भाषणं आणि बाबरी मशिद पाडण्याच्या कटात सहभाग उमा भारती – बाबरी मशिद पाडण्यासाठी प्रोत्साहनमुरली मनोहर जोशी- राम जन्मभूमी आंदोलनाला पाठिंबालालकृष्ण अडवाणी – रथयात्रेवर टीका, मात्र प्रमुख सूत्रधार म्हणून ठपका नाहीनरसिंह राव- बाबरी मशिद विध्वंस रोखण्यात दिरंगाईविश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, गिरीराज किशोर यांच्यावर टीका

close