शिवसेनेची दादागिरी धुडकावून लोकांनीच सुरु केलं केबल नेटवर्क

November 23, 2009 8:34 AM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर आयबीएन-लोकमतवर शिवसेनेच्या गुडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून शिवसेनेने बर्‍याच ठिकाणी आयबीएन लोकमतचं प्रक्षेपण बंद करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेनं दंडुकेशाहीच्या जोरावर मुंबईतल्या बर्‍याच ठिकाणी आयबीएन लोकमतचं प्रक्षेपण बंद केलं. पण शिवसेनेच्या या अरेरावीला लोकांनीच चपराक दिली आहे. त्यांनी स्वतःच केबल नेटवर्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे गजमुख डिस्ट्रीब्युटर प्रा. लिमिटेड या केबल नेटवर्कचं उद्घाटनही बोरिवली येथे करण्यात आलं.

close