सुनील राऊत अजूनही फरार

November 23, 2009 8:36 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर IBN लोकमतवरील हल्ल्याचा सूत्रधार सुनील राऊत अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. युद्ध पातळीवर राऊतचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतल्या भांडुप, कांजूरमार्ग, कर्जत, अलिबाग आणि पनवेलसह 12 ते 13 ठिकाणी पोलिसांनी छापे घातले. राऊत ज्या ठिकाणी लपून राहू शकतो, अशा सगळ्या ठिकाणांचा पोलीस तपास करत आहेत. अजूनपर्यंत फारसा चर्चेत नसलेला सुनील राऊत हा आयबीएन-लोकमतच्या हल्ल्यानंतर चर्चेत आला. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा भाऊ हीच त्याची ओळख आहे. आयबीएन-लोकमतवरच्या भ्याड हल्ल्यातला तो मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याला वॅान्टेड घोषित केलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला भांडुप पश्चिममधून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. संजय राऊत यांच्यामुळेच त्याला विधानसभेचं तिकीट मिळालं होतं. पण निवडणुकीत त्याला सपाटून मार खावा लागला होता. तो तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. भांडुप शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही या निवडणुकीत सेनेला नामुष्की पत्करावी लागण्याचं मुख्य कारण सुनील राऊतसारखा चुकीचा उमेदवार. उमेदवारी मिळण्यापूर्वी तो शिवसेनेच्या कुठल्याही पदावर नव्हता. उल्लेख करावा असा त्याचा कुठलाही व्यवसाय नाही.

close