मुंबईतल्या 334 शाळांची मान्यता संपुष्टात!

June 29, 2015 4:54 PM0 commentsViews:

29 जून : हजारो रुपये भरुन यावर्षी तुम्ही तुमच्या मुलांना नावाजलेल्या शाळांमध्ये दाखला घेतला असेल. पण त्या शाळांना मान्यता आहे किंवा नाही हा प्रश्न तुम्ही विचारला नसणार. मग ही बातमी ऐकुन तुम्हाला धक्का बसेल कारण, मुंबईतील अनेक नावाजलेल्या शाळांची मान्यता संपुष्ठात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात आलं आहे.

शिक्षण हक्क कायद्यानं सांगितलेल्या अटींची पुर्तता न केल्यामुळे या शाळांची मान्यता एप्रिल 2015 मध्ये संपली आहे. या यादीत दादरमधील गोखले एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, तसंच, माटुंगामधली डॉन बॉस्को हाय स्कूल आशा अनेक नामांकीत शाळांचा या यादीत समावेश आहे. त्यामुळे आता जर तुमची मुल शाळांमध्ये शिकत असतील तर त्या शाळेला मान्यता आहे की नाही याची पडताळणी करूण घ्या. मुंबईतील 334 शाळांची यादी बीएमसीच्या शिक्षण विभागानं तयार केली आहे. या सगळ्या शाळा अनुदान प्राप्त शाळा आहेत. फक्त मुंबईतचं नाहीतर राज्याभरातल्या अशा हजारो शाळ्यांची मान्यता संपली असण्याची शक्यता आहे.

या यादीतील काही महत्वाच्या शाळांची नावे : 

- चिकित्सक समूह पोद्दार, गिरगाव
– भाऊसाबेह हिरे, ताडदेव
– सेक्रेड हार्ट स्कूल, भायखळा
– गोखले एज्युकेशन सोसायटी, दादर
– सोशल सर्व्हीस लीग, परेल
– साधना विद्यालय, सायन
– राजा शिवाजी विद्यालय, दादर
– डॉन बॉस्को, माटुंगा
– होली क्रॉस, सात रस्ता

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close