भडगाव कोर्टाकडून राज ठाकरेंना जामीन मंजूर

November 23, 2009 8:38 AM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर राज ठाकरेंना जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परप्रांतीयांच्या विरोधातल्या आंदोलनात 20 ऑक्टोबर 2008 रोजी भडगावमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस. टी. बसेस फोडल्या होत्या. त्यामुळे 5 कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्या विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी राज ठाकरे हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्द अजामीनपात्र वॉरंट बजावल होतं. त्यामुळे राज ठाकरे सोमवारी कोर्टात हजर झाले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांची भडगावच्या कोर्टात प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close