‘साई सेंटर’वरून चंद्रकांत खैरे भाजपवर नाराज

June 29, 2015 2:19 PM1 commentViews:

ÞÖ¯ÖÖê»ÖËßÖêÛúÖê»Öæ ¸üÖêׯÖáÖ¸üÖê¯Ö

29 जून : शिवसेना भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. साई म्हणजे स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडियाचं रिजनल सेंटर औरंगाबादला होणार होतं. मात्र, आता ते नागपूरला होणार अशी घोषणा झाल्यामुळे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय दबावातून हे घडत असल्याचं खैरेंनी म्हटलं आहे. आयआयएम नागपूरला, आयआयटी नागपूरला, एम्स नागपूरला मग मराठवाडा आहे तरी कशासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे. याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असून असे चालणार नाही, असा इशाराही खैरेंनी दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • sachin aherkar

    विकासवादी दृष्टीकोन सुरुवाती पासूनच ठेवला असता तर ही वेळ आली नसती समाजाची मानसिकता विकासवादी विचारा एवजी तिरस्कार आणि मागास ठेवण्यात स्थानीक लोकप्रतिनीधीच जबाबदार असतात.

close