पुण्यात ट्रॅफिक पोलिसांना ब्लॅकबेरी मोबाईल

November 23, 2009 11:38 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबररस्त्यांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातल्या ट्रॅफिक पोलिसांना ब्लॅकबेरी मोबाईल देण्यात आले. पोलिसांना हे मोबाईल देण्याचा शुभारंभ राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तर पोलिसांनीही नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्या वाहनांच्या नंबरप्लेट दादा, नाना अशा असतात. या लोकांवर कडक कारवाई करावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या मोबाईलचं प्रात्यक्षिक रस्त्यावर ज्यावेळी दाखविण्यात आलं, त्यावेळी योगायोगानं दादा असं नाव असलेल्या व्यक्तीची गाडी पोलिसांनी पकडली. त्याला दंडाची पावती अजित पवारांच्या हस्तेच देण्यात आली.

close