वॉटर प्युरिफायरच्या 3 कोटींच्या खरेदीचं रहस्य काय?

June 29, 2015 10:01 PM0 commentsViews:

29 जून :  महिला आणि बाल कल्याण खातं चिक्की घोटाळ्यानं प्रसिद्धीत आला आहे. या खात्याने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून जवळपास तीन कोटींचे वॉटर प्युरिफायर कम फिल्टर खरेदी केले आहे. मात्र गंगापूरच्या ज्या पत्त्यावर एव्हरेस्ट इंडस्ट्रीज नावाच्या कं पनीची नोंद आहे. त्या पत्त्यावर जेव्हा आयबीएन लोकमत पोहचले तेव्हा तिथे प्रत्यक्षात एक झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी कोण्यात्याही प्रकारची कंपनी नसून कंपनीच्या नावाखाली एक छोटासा बोर्ड, एक खुर्ची आणि एक टेबल आहे. मात्र महिला आणि बाल कल्याण खात्याने या ठिकाणवरून तीन कोटीचं उत्पादन खेरदी केलेलं आहे. या कंपनीच्या अधिकार्‍याशी फोनवरून संपर्क केला तेव्हा आमची कुठलीही फॅक्टरी नाही. आपण फक्त वितरक आहोत. गुजरातमधल्या एका कंपनीकडून प्युरिफायर घेऊन ते महिला आणि बाल कल्याण खात्याला पुरवल्याचं त्या अधिकार्‍याने सांगितले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close