जुलै महिना कोरडा जाण्याची शक्यता

June 30, 2015 9:17 AM0 commentsViews:

d32no_rain_30 जून : जून महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजासह सारेच सुखावले होते. मात्र जुलै महिना कोरडा जाण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उष्ण कटीबंधीय भागाकडे जाणार्‍या पावसाला म्हणजेच पूर्वेकडे जाणार्‍या पावसावर जोरदार हवेमुळे परिणाम होतो. याला वैज्ञानिकीय भाषेत मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) या नावाने ओळखले जाते. म्हणजेच पावसाची 30 ते 90 दिवसांतील लहर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. एमजेओ जेव्हा भारतीय समुद्रातून जात असते तेव्हा भारतात मोठया प्रमाणावर पाऊस होतो. आता एमजेओने आपली दिशा बदलली असल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांतच याचा परिणाम दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण खालावले असल्याचे, भारतीय हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितलंय तसंच ‘अल निनो’ची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close