पंकजा मुंडे मुंबईत परतल्या, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

June 30, 2015 10:38 AM1 commentViews:

pankaja in mumbai30 जून : चिक्की घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आज (मंगळवारी) सकाळी मुंबईत परतल्या. गेले काही दिवस त्या लंडनमध्ये होत्या. आज पहाटे मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन झालं. यावेळी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पंकजाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी परिसर दणाणून सोडला. एका प्रकारे पंकजा यांनी शक्तीप्रदर्शन घडवून आणले.

पंकजा मुंडे यांच्या खात्याने कोणतंही ई-ट्रेडर न काढता अंगणवाड्यांच्या साहित्यांसाठी 206 कोटींचं कंत्राट देऊ केलं. या घोटाळ्यात तब्बल 113 कोटींची चिक्की खरेदी करण्यात आली. आपल्यावर झालेल्या आरोपांचं पंकजा मुंडे यांनी खंडन केलंय. पण, दुसरीकडे जर मी एक रुपयाची मिंदी असेल तर राजकारण सोडून देईन असं मुंडेंनी स्पष्ट केलंय.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजांची पाठराखण केलीये. आता, पंकजा मुडे मुंबईत दाखल झाल्या असून पंकजा मुंडे काय बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Kaka Gaikwad

  प्रिय
  पंकजा पालवे
  उर्फ चिक्कीताई

  चिक्कीताई,
  तुमचा ब्लॉग वाचला, गहिवरून आले, विधान सभेच्या वेळेस तूमचे भाषणे टिव्हीवर ऐकताना जसे रडायचो तसे रडावेसे वाटले, पण तुमचेच ते शब्द ऐकले (थोडे बदल करून) आता रडायचे नाय लिहायचे,
  ताई
  1) आपण सारखे-सारखे मी अजूनही बाबांच्या जाण्याने सावरले नाही असे म्हणून जनतेची फसवणूक करणे सोडून द्या,
  कारण उभा महाराष्ट्र जाणतो,
  आपले बाबा घातपाती गेले,पण याबद्दल आपण कुठेही वाच्यता न करता,कधीच चौकशी-नार्को टेस्ट साठी आग्रही राहीला नाहीत,आपल्या या समजंस्यपणामुळे आपण बाबा जाण्याच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरल्या आहात असे महाराष्ट्रातील जनतेला परिचित झाले आहे.

  2) आपल्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल कुठलेही स्पष्टीकरण न देता आपण फक्त भावनिकता आणी स्त्रीत्वाची ढाल करून सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत आहात,
  3) विधानसभेची निवडणूक पाहता याबाबत आपण माहिर आहात असे समजते…
  4) ताई, आपण म्हणता की माझ्या मुलाची तब्येत बरोबर नाही,डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याने मि लंडनला आले आहे..
  5) ताई आज आपण मंञी आहात म्हणून तूमच्या मुलाला विदेशात घेऊन जात आहात,तूमच्याऐवजी एक सामान्य शेतकऱ्यांची बायको असते तर ति आपल्या मुलाला घेऊन विदेशात गेली असती का ?
  जाऊ द्या,मि तूमच्या मुलाबद्दल काही बोलणार नाही,आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण लंडनला जाता,इथे आमच्या पोराला तालुक्याचा सरकारी दवाखान्यात नेणे होत नाही,असो..

  6) ताई आपल्या खात्यामार्फत वाटप करण्यात आलेल्या चिक्कीत माती/तार निघण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले,या बातम्या वर्तमानपञात आल्या,आपल्या खात्यामार्फत असे होत असेल तर आपण आदेश देऊन चौकशी का केली नाही?
  का आदिवासी म्हणून जन्माला आलेले मुले तूमचे कोणी लागत नाहीत का?
  7) आपला मुलगा लंडनची हवा खातोय आणी आदिवासी मुले माञ इथे मातीमिश्रीत चिक्की खात आहेत,
  ताई… त्या आदिवासी मुलांचा दोष एवढाच की त्यांचा जन्म हा तूमच्यापोटी झाला नाही,आणी त्यांची जन्मदाती आई हि काही मंञी नाही,अन्यथा ते पण तूमच्या मुलासारखेच हवा खाण्यासाठी विदेशात गेले असते,
  असो ..
  8) आपण म्हणता की माझे राजकारण संपवण्याचा डाव आहे, ताई,आपल्याकडे जर काहीच चूक नसती तर आपल्याला कसल्याच स्पष्टीकरणाची गरज पडली नसती,
  9) आपण म्हणता की माझ्या अनुपस्थितीत घरासमोर आंदोलने करण्याची गरज काय ? ताईसाहेब आपण जर पूर्णपणे निर्दोष असाल तर अशे हजारो आंदोलने झाले तरी काय फरक पडणार आहे,अशी आंदोलने इतर नेत्यांच्या दारात पण होतात,मुंडेसाहेबांचा वारसा चालवणाऱ्या आपण या प्रकरणामूळे मानसिक रित्या कमजोर होणे शक्यच नाही,आपण प्रतेक प्रश्नाचे उत्तर समर्थपणे दयाल
  आपण असे म्हणता,ताई माझा फक्त एकच प्रश्न आपणासाठी आहे…..

  10) मातीमिश्रीत चिक्कीच्या तक्रारी येऊनही आपण त्यावर कारवाई का केली नाही ?

  या एवढ्याच एका प्रश्नाचे उत्तर द्या
  11) ताईसाहेब, आपण वरून म्हणता की मि कुणाच्या रूपयात मिंदी नाही,जर खरच आपण रूपयात पण मिंद्या नसाल तर LIVE टिव्हीवर 206 कोटींचा हिशोब देण्याचे धाडस दाखवाल का ?
  12) ताई खोटे बोलण्याची पण एक हद्द असते,कदाचित मोदी फेकतात,तसे आपणही फेकू असे आपल्याला वाटले असेल.
  13) आपण म्हणालात की 24 तास आपण जेवला नाही, (तुम्हालाच माहीत काय खरे ते)

  14) यापुढे आपण म्हणालात,
  “झोपले तर मी गेल्या वर्षभरात नाही” ताई आपली नोंद तर ‘गिनीज बुक’मधे करायला हवी,
  15) आपण म्हणता की मी गोचीडासारखी खुर्चीला चिकटून बसणार नाही, लंडनहून वापस आल्यावर खुर्ची सोडण्याचे संकेत आहेत का हे ?
  16) आपल्या खात्यात जर गैरव्यवहार झाला असेल तर त्या अधिकाऱ्यास निलंबीत करायचे सोडून आपण भावनिकता निर्माण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करत आहात,त्यावरून या प्रकरणात नक्कीच आपला हात आहे की काय असा गैरसमज महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होत आहे!!

  17) ताई आपण विकत घेतलेल्या water purifre चा पत्ता गणपती गल्ली गंगापूर हा तद्दन बोगस निघालाय. याचं स्पष्टीकरण जरा दयाल काय.
  18) ताईसाहेब 9कोटीचं काँट्रॅक्ट ज्या वैद्य ईंडस्ट्रीज ला आपण दिलं त्याच्या आर्थिक स्थिती बद्दल आपल्याला जराही चौकशी करावी वाटली नाही का.
  किंवा त्याचं टेंडर काढावंस वाटलं नाही का.
  19) इ-टेंडरींग चे सगळे नियम धाब्यावर बसवून एकाच दिवसात दोनशे अध्यादेश जारी करण्याची एवढी कसली लगीनघाई होती बे जरा इसकटून भोळ्या जनतेला सांगाल का?

  20) ताईसाहेब तूमच्या त्या RADICO (दारूच्या कारखान्या) बद्दल तर न बोललेले बर !!

  कारखान्याचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत टाकण्यात बंदी घातली ओ ताईसाहेब.. लवकर लंडनमधून येऊन ति बंदी उठवा…

  ताईसाहेब,
  कळावे,
  तूम्हाला मतदान करून फसलेला

  एक सामान्य माणूस..!!!

close