कविता करकरे आणि स्मिता साळस्करांनी घेतली सोनीया गांधीची भेट

November 23, 2009 1:51 PM0 commentsViews: 15

23 नोव्हेंबरशहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे आणि शहीद विजय साळस्कर यांच्या पत्नी स्मिता यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधींची भेट घेतली. सोनियाजींनी आम्हाला यावेळी सर्व ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या आम्ही ज्या परिस्थितीतून जातो आहोत, ते भीषण वास्तव सोनियाजींनीही अनुभवलं असल्यामुळे त्यांनी आमचं दुख चांगल्या प्रकारे जाणून घेतलं असं त्यांनी सांगितलं. तर शहिदांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा व्हायला हवा, असं मत शहीद साळस्करांच्या पत्नी स्मिता साळस्कर यांनी व्यक्त केलं.

close