विजेंद्रर सिंगचा हौशी बॉक्सिंगला रामराम, व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगणात

June 30, 2015 11:44 AM0 commentsViews:

vijendra30 जून : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगनं भारतीय बॉक्सिंगला पंच लगावलाय. विजेंदर सिंगने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश केलाय.

लंडनच्या फ्रँक वॉरेन आणि क्वीन्सबेरी प्रमोशन्स या कंपनीबरोबर विजेंदरनं करार केलाय. त्यामुळे आता विजेंदर देशासाठी खेळू शकणार नाहीये.

याचाच अर्थ असा की, 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही विजेंदर भारताचं प्रतिनिधित्व करू शकणार नाहीये. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदरनं भारताला बॉक्सिंगमधील पहिलं वहिलं ब्राँझ मेडल पटकावून दिलं होतं.

तर एशियन गेम्समध्ये गोल्ड आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावण्याची किमयाही विजेंदरनं केलीये. पण, आता त्याने हौशी बॉक्सिंगला रामराम ठोकला असून व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगणात उतरलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close