शहीदांच्या नातेवाईकांना पंधरा दिवसांत मदत देणार – गृहमंत्री

November 23, 2009 2:06 PM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबरमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांच्या नातेवाईकांना येत्या पंधरा दिवसात मदत देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. 26/11 हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे त्यानिमित्ताने सरकारच्यावतीने मंगळवारी एका पत्रकार परिषद घेण्यात आली. 26/11 चा उल्लेख ब्लॅक डे असा होईल, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसंच गेटवे ऑफ इंडियावर विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सागरी किनार्‍यावरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी गृहमंत्रालय 226 कोटींची तरतूद करणार आहे. शिवाय 204 कमांडोजना दहशतवाद विरोधी प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. दहशतवादाशी लढा देण्यासाठी आता अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं. नुकताच मुंबई पोलीसचे माजी आयुक्त हसन गफूर यांनी केलेल्या आरोपाबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलण्याचं टाळलं.

close