भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणं दुदैर्वी, शिवसेनेचे भाजपला चिमटे

June 30, 2015 5:20 PM0 commentsViews:

arvind bhosle

30 जून : जनतेला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन हवं आहे. अशावेळी भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणं दुदैर्वी असल्याचं सांगत शिवसेनेने भाजपला चिमटा काढला आहे. पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळा, त्यानंतर राज पुराहितांचं स्टिंग ऑपरेशन आणि आता शिक्षणमंत्री विनोद तावडेंही कंत्राट यांसारख्या वादांमुळे भाजप सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यावर भाष्य करताना जनतेला स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन हवंय असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी भाजपला लगावला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या पद्धती, ज्यावर तुम्हीच टीका केली होती, ते खरेदीसाठी कसं वापरू शकता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामळे अडचणीत असणार्‍या मित्रपक्षाला शिवसेनेची साथ नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close