मंगळवारी कानपूर मध्ये भारत-श्रीलंका दुसरी टेस्ट मॅच

November 23, 2009 2:08 PM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानची दुसरी टेस्ट मॅच मंगळवारपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. श्रीलंकन टीमने सोमवारी पीचची पाहाणी केली. पहिल्या टेस्टवर श्रीलंकेचंच वर्चस्व होतं. त्यामुळे दुसर्‍या टेस्टसाठी श्रीलंका टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. माजी कॅप्टन महेला जयवर्धनेनं डबल सेंच्युरी ठोकली होती. त्यामुळेच श्रीलंका टीमला भारतात विक्रमी स्कोअर उभारता आला. श्रीलंकेच्या टीमचे काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तिलकरत्ने दिलशानच्या नाकाला मार लागला आहे. पण तो त्यातून सावरलाय. अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाल्या नंतर आता दुसर्‍या टेस्टचा निकाल लागावा असाच दोन्ही टीमचा प्रयत्न असेल.

close