व्यापम घोटाळा : दिग्विजय सिंहांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

July 1, 2015 10:22 AM0 commentsViews:

digvijay singh4301 जुलै 2015 : व्यापम घोटाळ्यात आता काँग्रेसनेही आता यात उडी घेतली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सीबीआय चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये. मंगळवारी आणखी एका संशयिताचा मृत्यू झाला.

यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये अमित सागर याचा मृतदेह सापडला होता. मृतांचा आकडा आता 44 वर पोहचलाय. मध्य प्रदेश हायकोर्टाने स्थापन केलेल्या एसआयटीने विशिष्ट कार्य आयोगाला या मृतांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तरीही भाजप मात्र अजूनही आपल्या मतावर कायम आहे. या मृतांचा काही घोटाळ्याशी संबंध नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.तर दुसरीकडे पीडितांच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close