विकिपीडियावर नेहरू ‘मुस्लीम’, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

July 1, 2015 3:37 PM0 commentsViews:

Jawaharlal Nehru

01 जुलै :  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विकिपीडियावरील पेजवर सरकारी आयपी ऍड्रेसवरून काही फेरफार करण्यात आला असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नेहरुंचे आजोबा गंगाधर नेहरु हे मुस्लीम असल्याचं या पेजवर म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू यांच्या आजोबा यांच्या विकिपीडिया पेजेसमध्ये फेरफार करण्यात आलेत. या प्रकरणात सरकारचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसंच, याचे धागेधोरे भारत सरकारच्या आयपी ऍड्रेसपर्यंत जात असल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सरकारी कॉम्प्युटर हॅक करुन हे बदल केले गेले असावे अशी शक्यताही त्यांनी वर्तवली जात आहे. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close