लिबरहान आयोगाच्या अहवालासोबत कृती अहवालही सादर

November 24, 2009 9:23 AM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर लिबरहान आयोगाच्या अहवालाबरोबरच सरकार कोणती कारवाई करणार याची माहिती देणारा ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणजेच कृती अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला आहे. या एटीआरची एक्सक्लुझिव्ह माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित सर्व कोर्ट केसेस जलद गतीने चालवण्यात येणार आहेत. तर राजकीय नेत्यांनी धार्मिक अथवा धर्मादाय संस्थांमध्ये पदं स्वीकारू नयेत, असंही यात म्हटलं आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धार्मिक हिंसेचा मुकाबला करण्यासाठी एक नवा कडक कायदा अस्तित्वात करण्यात येणार आहे.

close