बलात्काराच्या खटल्यात तडजोड बेकायदेशीर : सुप्रीम कोर्ट

July 1, 2015 4:37 PM0 commentsViews:

Supreme court of india

01 जुलै :  बलात्काराच्या खटल्यांप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बलात्काराच्या प्रकरणात कोर्टाबाहेर तडजोडीला परवानगी देणं किंवा तसं सुचवणं हे अत्यंत चुकीचं आहे. महिलेच्या आत्मसन्मानाशी केलेली ही तडजोड आहे,’ असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच बलात्कारी आणि पीडित यांच्यात मध्यस्थी किंवा तडजोडीचा प्रयत्न करणं बेकायदेशीर असल्याचं परखड मत सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तामिळनाडूतील एका तरुणाला शिक्षा झाली होती. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती पी. देवदास यांच्यापुढे आलं असता त्यांनी बलात्कारी आणि पीडित मुलीने आपसात चर्चा करून न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवावं, असा सल्ला दिला होता. या निर्णयावर पुन्हा सुनावणी देताना, अशी प्रकरणात कोर्टाच्या बाहेर तडजोड करायला सुप्रीम कोर्टाने तीव्र विरोध केला आहे. कोर्टाबाहेर तडजोड करणं म्हणजे पीडितेच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवणं आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. बलात्कारी आणि पीडित यांच्यात मध्यस्थी किंवा तडजोडीचा प्रयत्न करणं बेकायदेशीर असल्याचं परखड मत सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close