आता सरकार तुमच्या ‘बोटांवर’ चालणार!, मोदींच्या हस्ते डिजीटल इंडिया वीकचं उद्घाटन

July 1, 2015 9:22 PM0 commentsViews:

asrnj;aehurhy

01 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेच्या ‘डिजिटल इंडिया वीक’चं उद्घाटन केलं. देशाचा कायापालट करण्याची ताकद तंत्रज्ञानात असून ‘डिजिटल इंडिया’मुळे देशाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या अंतर्गत देशातील गावागावात इंटरनेट पोहोचवण्याचा निर्धार असून यामध्ये साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक होणार आहे. तसंच ‘डिजिटल इंडिया’मुळे 18 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 1 ते 7 जुलै दरम्यान डिजिटल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘डिझाईन इंडिया’ देखील महत्त्वाचं असल्याचं सांगत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे, असं मोदी म्हणाले. यापुढे बँकांचा व्यवहार पेपरलेस करण्यात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यात आणि संपूर्ण सरकार मोबाईलवर येण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. ‘डिजिटल इंडिया वीक’च्या घोषणेसोबतच मोदींनी यावेळी सायबर सुरक्षेचा मुद्दादेखील उपस्थित केला. सायबर सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असून यासाठी भारतीय तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत. सायबर सुरक्षेमध्ये भारताने जगाचं नेतृत्व करावं, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close