‘ बाबरी उध्वस्त होताना अडवाणी आणि भाजप नेते 200 मीटरवर ‘

November 24, 2009 9:46 AM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर इंडियन एक्सप्रेसने फुटलेल्या लिबरहान आयोगातली आणखी धक्कादायक माहिती मंगळवारी छापली आहे. कारसेवक बाबरी मशीद उध्वस्त करत असताना भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि विनय कटियार हे फक्त 200 मीटर अंतरावर उभे होते. बाबरी पाडण्यापासून या नेत्यांनी कारसेवकांना रोखलं नाही, असं लिबरहान आयोगानं म्हटलं आहे. मशिदीचे घुमट उध्वस्त करण्यापासून किंवा गाभार्‍यात जाण्यापासून कारसेवकांना कोणीही रोखले नाही, असंही लिबरहान यांनी अहवालात म्हटल्याचं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे. अडवाणी, जोशी, सिंघल, विजयाराजे शिंदे, आरएसएसचे नेते एच. व्ही. शेषाद्री यांनी कारसेवकांना बाबरीच्या घुमटावरून खाली उतरवण्याचा केवळ अयशस्वी प्रयत्न केल्याचही यात म्हटलं आहे.

close