प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा

November 24, 2009 9:49 AM0 commentsViews: 44

24 नोव्हेंबर प्रतापगडावर मंगळवारी शिवप्रतापदिन साजरा होत आहे. गडावरील शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानिमित्तानं पोलिसांकडून मानवंदना दिलीे, जिल्हाधिकारी भवानी देवीची पूजा ही केली. यावेळी शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूकही काढण्यात आली. अफजलखानाच्या कबरीवरून गेली काही वर्ष वाद निर्माण झाल्याने शिवप्रताप दिनाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास दीड हजार पोलीस वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड इथे तैनात करण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे, हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमोद मुतालिक यांना गडावर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. यानिमित्ताने सरकारन बंदी घातलेल्या अफजलखान वधाची पोस्टर्स गावोगावी लावणार असल्याचं एकबोटे यांनी म्हटलं आहे. गेली 15 वर्षे हा उत्सव जिल्हा प्रशासनातर्फे साजरा होतो.

close