मुंबईतल्या नालेसफाई चौकशी समितीचा अहवाल जुजबी

July 2, 2015 1:23 PM0 commentsViews:

India Mansoon02 जुलै : मुंबईतल्या नालेसफाईबाबत चौकशी करण्याची नेमलेल्या समितीला आता 17 ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे. दिलेल्या मुदतीत या समितीनं केवळ जुजबी अहवाल दिल्यानं आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय.

मागील महिन्यात 24 जूनच्या पावसानं मुंबई पुन्हा एकदा तुंबली होती, त्यानंतर उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. मुंबईत 200 किमीचे नाले असताना फक्त 9 किमी पर्यंतच्या नाल्यांच्या स्वच्छता कामांचा अभ्यास ही समिती करणार होती, मात्र तेवढं कामही ही समिती करू शकली नाही. त्यामुळं ही चौकशी फक्त फार्स आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close