नागोठण्याच्या अंबा नदीत डॉल्फिन !

July 2, 2015 1:44 PM0 commentsViews:

 dolphin in raigad
02 जुलै : रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील अंबा नदीत आज चक्क डॉल्फिन माशाचं दर्शन झालं. हा डॉल्फि न आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी एका मच्छीमाराने डॉल्फिन ला पाहिले डॉल्फिन नदी पात्रात आला कसा याचे सर्वानाच आश्चर्य वाटते आहे. अखेर 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉल्फिनला समुद्रात सुखरूप परत पाठविण्यात वनखाते आणि कांदळवन विभागाच्या पथकाला यश आले.

बुधवारी दुपारी नागोठण्याच्या अंबा नदीत डॉल्फिनला उड्या मारताना एका मच्छीमाराने पाहिले. ही बातमी वार्‍यासारखी पसरली आणि डॉल्फिनला पाहण्यासाठी लहान मोठ्यांनी गर्दी केली. अनेकांनी त्याच्या दर्शनासाठी तासांतास घालवले आणि आपल्या मोबाईलमध्ये टिपले.सुमारे चार ते साडेचार फूट लांबीच्या डॉल्फिनला प्रत्यक्ष नदीत पाहण्याची संधी नागोठणेकरांना मिळाली.

या माशाला सुखरूप समुद्रात सोडण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न केले. ठाणे येथून कांदळवन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. सांयकाळी हे पथक दाखल झाल्यानंतर तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर भरतीच्या वेळी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या डॉल्फिनला समुद्रात परत पाठविण्यात यश आलें. यामध्ये स्थानिक मच्छीमारांची मोठी मदत झाली

मागील आठवड्यात रेवदंडा समुद्रकिनारी देवमासा आला होता. आता अंबा नदीच्या पात्रात चक्क डॉल्फिन पहायला मिळाला. समुद्रात वावरणारा हा मासा नदीपात्रात आला कसा याचेच आश्चर्य सर्वांना वाटून राहिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close