कानपूर टेस्ट पहिल्याच दिवशी भारताचा 417 रन्सचा डोंगर

November 24, 2009 1:09 PM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबरकानपूर टेस्टमध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं भारतान पहिल्या दिवस अखेर 2 विकेट गमावत 417 रन्स केले. भारताच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवसाचा हा हायेस्ट स्कोर आहे. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या गंभीरनं सेहवागबरोबर पहिल्या विकेटसाठी तब्बल 233 रन्सची पार्टनरशिप केली. सेहवाग 131 रन्सवर आऊट झाला. तर गंभीरनं 167 रन्सची खेळी केली. मुथय्या मुरलीधरनने त्यांची विकेट घेतली. पण यानंतर द्रविड आणि सचिन तेंडुलकरनं सावध बॅटिंग करत आणखी विकेट जावू दिली नाही. राहुल द्रविडही सेंच्युरीच्या वाटेवर आहे. पहिल्या दिवस अखेर द्रविड 85 तर सचिन तेंडुलकर 20 रन्सवर नॉटआऊट आहेत.

close