मुंबईच्या महापौरपदासाठी एक डिसेंबरला निवडणूक

November 24, 2009 1:31 PM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबरमुंबईच्या महापौर पदासाठी एक डिसेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी 27 नोव्हेंबरला नामांकनं दाखल केलं जाणार आहे. महापौरपदावर कब्जा मिळवण्यासाठी आता काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचवीस तारखेला काँग्रेसच्या सर्व नगरसवेकांची बैठक होणार आहे. विद्यमान महापौर शुभा राऊळ यांचा कार्यकाळ तीस नोव्हेंबरला संपत आहे. एक डिसेंबरला तारखेला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा महिला विराजमान होणार हे महापौरपदाच्या सोडतीनंतर स्पष्ट झालं होतं.

close