मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली ?, सेनेनं उडवली खिल्ली

July 3, 2015 9:52 AM0 commentsViews:

bejp_meet_uddhav_thacakrey03 जुलै : भाजप मंत्र्यांवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होतायत, आणि यावरूनच पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपला चांगलेच चिमटे काढलेत. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणे लगावलेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली, हे तपासावं लागेल. सेनेशिवाय राज्य चालवू शकू, अशी भाजपची श्रद्धा होती, पण शिवरायांना हे मान्य नसावे, आणि आज मुख्यमंत्री आणि भाजपचे तालेवार मंत्री वादळात सापडले आहेत असा टोला सेनेनं लगावलाय. तसंच फडणवीस यांच्या परदेश दौर्‍याची अक्षरशः खिल्ली उडवण्यात आलीय. दरम्यान, कुठे काय चुकलंय यावर एकदा ‘बसावच’ लागेल, मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा..असं म्हणून या अग्रलेखाचा शेवट करण्यात आलाय.

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलंय ?

– मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हे तपासून पहावे लागेल. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी यात तडमडू नये. पण शेवटी वर्षभरातच अशा वावटळी का उठत आहेत ? कुठे काय चुकत आहे यावर एकदा बसावे लागेल. आधी बसू मग बोलू. मुख्यमंत्र्यांनी परदेशातून मोठा उद्योग आणल्यावरही बसता आणि बोलता येईल.

- आम्हाला आठवते ते असे की, चर्चगेटच्या त्या भव्य स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त भाजपच्याच मंत्र्यांनी मोठ्या ऐटीत आणि झोकात शपथ घेतली होती. शिवसेनेशिवाय महाराष्ट्रातील नवे राज्य लीलया चालवू शकू अशी त्यांची श्रद्धा होती पण बहुधा महाराष्ट्रातील कुलदैवतांना , शिवरायांना हे मान्य नसावे आणि आज मुख्यमंत्र्यांसह भाजपचे तालेवार मंत्री वादळात सापडले आहेत

- मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या मंडळात परदेशी होते. त्यामुळे विमानास विलंब करुन परदेशी यांचा व्हिसा घरून मागवला आणि नंतर विमानाचे उड्डाण झाल्याचे वृत्त आहे. एखाद्या सामान्य आजारी, अपंग व्यक्तीच्या बाबतीत असे नियम मोडण्याचे समाजकार्य झाले असते काय ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close