बाळासाहेबांचा 23 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात

July 3, 2015 11:41 AM0 commentsViews:

03 जुलै : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा सुरू आहे. पण, आता बाळासाहेबांचा 23 फुटांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. ब्रांझच्या या 23 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं काम ताडदेव इथंल्या एका कार्यशाळेत काम सुरू आहे.

Balasaheb Statue imageया पुतळ्याची पाहणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली . सध्या पुतळ्याच्या पॉलिशिंगचं काम सुरु असून अंतिम कामासाठी पुतळा कोल्हापूरला पाठवण्यात येईल. शिल्पकार यावलकर हा पुतळा साकारतायत. पण, हा पुतळा मुंबईत कुठे उभारणार याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

-

close