ढोरे कुटुंबीयांना महेश मांजरेकरांचा मदतीचा हात, दरमहा 10 हजार रुपये दिली मदत

July 3, 2015 12:51 PM4 commentsViews:

manjrekar help03 जुलै : मुंबई पोलिसांत 22 वर्ष काम करणारे देवराव ढोरे कुटुंबीयांवर प्रशासनाच्या असंवेनशीलपणामुळे उपासमारीची वेळ आलीये. आयबीएन लोकमतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झालाय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर ढोरे कुटुंबीयाच्या मदतीला धावून आले आहेत. ढोरे कुटुंबीयांना दर महिन्याला 10 हजार रुपये ‘मिक्टा’कडून देण्यात येतील, असं मांजरेकरांनी जाहीर केलंय.

मुंबई पोलीस दलात काम करणारे देवराव ढोरे मुंबई पोलीस दलातील 22 वर्षांच्या सेवेनंतरही आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीये. 28 मार्च 2012 रोजी कामावरुन परतत असताना काँन्स्टेबल ढोरे एका रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार लागल्यानं देवराम ढोरे यांची सध्याची अवस्था मरणापेक्षाही वाईट झालीये. अशा अवस्थेत ढोरेंची दृष्टीही गेली आहे.

त्यामुळं त्यांना कामावर गैरहजर राहण्याचा दाखला देत मुंबई पोलिसांनी त्यांना रुग्णता सेवानिवृत्त केलंय. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्‌या धोरणामुळे ढोरे यांना मिळणारा पगार जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलाय. याबरोबर निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटीमधूनच पोलीस दलाचं झालेलं नुकसानही भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीये. आयबीएन लोकमतने या बहादूर पोलिसाची व्यथा जगसमोर मांडलीय. त्यानंतर आता देवराव ढोरे यांना समाजातून मदत मिळू लागलीय, पण सरकारला जाग कधी येणार, हा खरा प्रश्न आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Someone Something

  Good Work Sir

 • vaibhav sangave

  i have one story like accident of police constable. accident had 11/05/2011

 • kadir suta

  nice job

 • Himani Ranade

  Very nice sir . Really Good work ……!

close