डॉक्टरांच्या संपाने घेतला 6 महिन्यांचा बाळाचा बळी ?

July 3, 2015 1:24 PM1 commentViews:

mard strike_kem03 जुलै : रुग्णांना वेठीस धरून आपल्या मागण्यांसाठी अडून बसलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत एका सहा महिन्यांचा बाळाचा उपचारा अभावी मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या उपचाराअभावी परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये सहा महिन्याचं बाळ दगावलं आहे.

या बाळाला भाजलं असल्यानं त्याला केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाळाची प्रकृती खालावल्यावर त्याच्या वडिलांनी डॉक्टरांना बोलावलं मात्र जुजबी तपासणी करून डॉक्टर निघून गेले ते आलेच नाहीत .डॉक्टर आणि सरकार आपल्या बाळाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असा आरोप मृत बाळाचे वडील नूर आलम यांनी केलाय.

विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मार्ड संघटनेच्या डॉक्टरांची बैठक झाली. डॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. डॉक्टरांची सुरक्षा वाढवून देण्याचं आपण मान्य केलं असून जर निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला. तर स्वत: त्या मेडिकल कॉलेजचे डीन संबंधित डॉक्टरांसोबत जाऊन पोलिसांत गुन्हा नोंदवतील, असं तावडेंनी सांगितलंय. शिवाय जर मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया ‘मॅटर्निटी लीव्ह’ भरपगारी द्यायला तयार असेल तर सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. विद्या वेतनातही 5,000 रुपयांची वाढ मान्य करण्यात आली आहे. पण, सरकारने फक्त 75 टक्के मागण्या मान्य केल्या आहे असा प्रतिदावा करत डॉक्टरांनी आज दुसर्‍या दिवशी संप सुरूच ठेवलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ganesh Sathe

    Shame on Medical Association ! Now Medical is business ! not for helping nature to human ! Shame on Doctors !!

close