तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांनी मदत नाकारली

November 25, 2009 8:37 AM0 commentsViews: 69

25 नोव्हेंबर 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांच्या मुलीने मदत नाकारली आहे. वैशाली ओंबळे यांनी मंगळवारी मुंबईत जमशेटजी जीजाभाई बेनेवोलेंट इस्टिट्यूटच्या कार्यक्रमात तीन लाखाच्या मदतीचा चेक स्वीकारण्यास नकार दिला. आपल्या आता मदतीची गरज नसल्याचं वैशाली ओंबळेंनी स्पष्ट केलं आहे. तसंच हे पैसे विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती आणि विकासासाठी वापरावेत अशी ओंबळे कुटुंबीयांची इच्छा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

close