26/11च्या हल्ल्यात पोलीस अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा – विनीता कामटे

November 25, 2009 9:20 AM0 commentsViews: 18

25 नोव्हेंबर 26/11च्या हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे या जिगरबाज अधिकार्‍यांचा मृत्यू सरकार आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी केला आहे. 26/11च्या मुंबईवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होते आहे. या निमित्ताने अशोक कामटे यांची पत्नी विनीता कामटे यांनी 'टू द लास्ट बुलेट' हे पुस्तक लिहिल आहे. या पुस्तकातून ही खंत व्यक्त केली आहे.मंगळवारी त्यांच्या पुस्तकाच मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी आपल्या द लास्ट बुलेट या पुस्तकात सरकारसमोर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. माहितीच्या अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोप केले आहेत. तेव्हचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांना हेमंत करकरेंच ठिकाण 12: 56 वाजता माहित होतं, याकडे क्राईम ब्रॅन्चचे जॉईंट सीपी राकेश मारियांनी याकडे दुर्लक्ष का केलं- कॉल लॉगमध्ये स्पष्ट लिहिलं होतं कि 11.24 वाजता कामाच्या मागील गेटवर करकरे आणि कामटे आहेत, शिवाय ते जखमी असल्याचीही त्यात नोंद आहे. कामा हॉस्पिटलमध्ये असणार्‍या अशोक कामटेंना फोन केला नाही असं राकेश मारिया म्हणत आहेत. पण वायरलेस लॉग मध्ये मारियांनी फोन केल्याची नोंद आहे. करकरे, साळस्कर आणि कामटेंना एकत्र यायचे आदेश कोणी दिले ?कामाजवळ जखमी झालेल्या अधिकार्‍यांना 40 मिनीटं मदत का मिळाली नाही ?कामटेंच्या हातात गोळी गेल्याने खूप रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. वेळीच उपचार मिळाले असते तर ते वाचले असते. हे अधिकारी जखमी असताना तिथून 3 जीप निघून गेल्या पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही ? करकरेंनी कंट्रोल रुमकडे मदत मागितल्यानंतर त्यांचा आदेश का पाळण्यात आला नाही ?कामाकडे पाठवण्यात आलेले 200 पोलीस कुठे होते ? असे प्रश्न विनिता कामटे यांनी उपस्थित केले आहेत.

close