भुजबळांनी संपत्तीचे सर्व लेखी पुरावे सादर करा – हायकोर्ट

July 3, 2015 6:51 PM0 commentsViews:

Chagan Bhujbal

03 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना संपत्तीचे सर्व लेखी पुरावे आणि व्यव्हाराचे पुरावे सादर करा असं आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 22 जुलैपर्यंत याबाबतचा आहवाल सादर करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

बेहिशोबी मालमत्ता आणि कोटयावधी रुपयांच्या फर्निचर खरेदीचा हिशोब आणि ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, या बद्दलही माहिती द्या, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसंच भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांनीही ज्या ठिकाणी गुंतवणूकीबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close