सुनील राऊतला दोन दिवसांची पोलीस कोठडी

November 25, 2009 9:31 AM0 commentsViews: 6

25 नोव्हेंबर IBN लोकमतवरील हल्ल्याचा सूत्रधार सुनील राऊतला विक्रोळी कोर्टाने 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 13 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व आरोपींना बुधवारी विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं. गुंड सुनील राऊत मंगळवारी रात्री पोलिसांना शरण आला होता. खासदार संजय राऊत यांचा तो भाऊ आहे. मात्र त्याला शाही वागणूक दिल्याबद्दल सगळीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याआधी सकाळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतची विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये भेट घेतली.

close