आयसीसच्या मदतीने जेलमधून पळून जाण्याचे भटकळचे मनसुबे

July 4, 2015 2:13 PM0 commentsViews:

bhatkal120904 जुलै : हैदराबाद तुरुंगात असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख यासीन भटकळ आयसीस संघटनेच्या मदतीने पळून जाण्याचा प्लॅन आखलाय. एका दैनिकाने याबाबत फोन रेकॉर्ड कॉलचा दुजोरा देत हा गौप्यस्फोट केलाय. जेलमधून हा फोन करण्यात आला होता या फोनच्या संभाषणावरून भटकळ जेलमधून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोरं आलंय.

भटकळने जेलमधून आपल्या पत्नीला फोन केल्याचं स्पष्ट झालयं. यावेळी भटकळने आपण देशातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आयसीसच्या मदतीने जेलबाहेर पडणार असल्यांचं सांगितलंय. भटकळने जवळपास 5 मिनिटं आपल्या पत्नीशी चर्चा केली. भटकळ यांच्या फोन कॉलमुळे गुप्तचर यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

यावर हैदराबाद जेलनं स्पष्टीकरण दिलंय. यासीन भटकळबाबत आम्ही सुरक्षेची काळजी घेत आहोत. सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा होत नसल्याचंही जेल प्रशासनानं सांगितलंय. प्रत्येक कैद्याला आठवड्यातून दोन वेळेस फोन करायला परवानगी असल्याची माहिती तुरुंग प्रशासनानं दिली आहे. पण, यासीन भटकळनं त्याच्या पत्नीला केलेल्या फोनची सुरक्षा यंत्रणांनी चौकशी केली. त्यावेळेस यासीन आपण लवकरच जेलमधून बाहेर पडणार असल्याचं वारंवार सांगत होता हे स्पष्ट झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close