ग्रामीणभागाचं भीषण वास्तव, 75 टक्के कुटुंबांची महिन्याची कमाई 5 हजारांपेक्षा कमी !

July 4, 2015 2:44 PM0 commentsViews:

village survey3404 जुलै : महासत्ता होण्याची स्वप्न पाहणार्‍या भारताचं जळजळीत वास्तव पहिल्याच सामाजिक आर्थिक स्थिती आणि जातीय जनगणनेतून समोर आलंय. ग्रामीण भागातल्या तब्बल 92 टक्के कुटुंबाची महिन्याची कमाई 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. 75 टक्के कुटुंबाची कमाई पाच हजारांच्या खाली आहे. केवळ शारीरिक कष्ट करून जगणारी कुटुंबं 9 कोटींपेक्षा जास्त आहेत. ग्रामीण भारतातल्या 56 टक्के कुटुंबांकडे आजही स्वत:च्या मालकीची जमीन नाही. जवळपास 30 टक्के म्हणजे 5.37 कोटी भूमिहीन कुटुंबं आहे. या जनगणनेचा तपशील शुक्रवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलीय. या जनगणनेवरून ग्रामीण भारताचं खरं चित्र काय आहे, यावरून आपल्याला दिसतंय.

पगार पाच हजारांच्याखालीच !

एवढ्याशा पगारात काय होणार ?, या पगारात घरं कसं धकतं?, हे प्रश्न सर्वसामन्यांना सदैव भेडसावत असतात. पण, ग्रामीण भागात जर पाहिलं तर पगार टंचाईचं चित्र समोर आलंय. ग्रामीण भागातील व्यक्तींच्या पगारावर नजर टाकली तर, पाच हजारांपेक्षा कमंी पगार असणार्‍यांची संख्या तब्बल 13.34 कोटी इतकी आहे. 5 ते 10 हजार कमावणार्‍यांची संख्याही 3.08 कोटी आहे. आणि 10 हजारांपेक्षा जास्त कमावणार्‍यांची संख्याही 1.48 कोटी आहे. सरकारी नोकर्‍यांमध्ये ग्रामीण भागातील प्रमाण फक्त 5 टक्के इतकच आहे. सार्वजनिक क्षेत्रात तर 1 टक्का आणि खाजगी क्षेत्रात 4 टक्के इतके प्रमाण आहे.

मोबाईल फोन जास्त !

‘खायाला राशनचा कोंडा आणि फिरायला हिरो होंडा’ असं चेष्टनं ग्रामीण भागात म्हटलं जातं ते उगाच नाही त्याचंच एक उदाहरण या सर्व्हेच्या निमित्ताने समोर आलंय. ग्रामीण भागात गरिबीचं प्रमाण कमी असलं तरी मोबाईल फोन वापरण्याची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील 68.3 टक्के कुटुंब मोबाईल फोन वापरते. 17.43 टक्के कुटुंब दुचाकी वापरतात तर 2 टक्के कार आणि 11 टक्के कुटुंब घरात फ्रीज वापरतात.

या जनगणनेतली आकडेवारी काय सांगते ?

- तीन चतुर्थांश लोक ग्रामीण भागात राहतात
- ग्रामीण भागातल्या कुटुंबांची संख्या – 17.91 कोटी
- स्वत:च्या मालकीची जमीन नसणारी कुटुंबं – 56 टक्के
- सुविधांपासून वंचित असलेली कुटुंबं – 8.69 कोटी (48.5 टक्के)
- एका खोलीची कच्ची घरं – 2.37 कोटी (13.3 टक्के)
- भूमिहीन कुटुंबं (शारीरिक श्रम करणारी) – 5.37 कोटी (30 टक्के)
- कुटुंबप्रमुख महिला असणारी घरं – 69 लाख (3.9 टक्के)
- 18 ते 59 वयोगटातील व्यक्ती नसणारी घरं – 65 लाख (3.6 टक्के)
- दलित आणि आदिवासी कुटुंबं – 3.86 कोटी (21.5 टक्के)

ग्रामीण भागातला पगार
 पगार (रु.) कुटुंबं टक्के
- 5000 पेक्षा कमी 13.34 कोटी 74.5%
- 5000 ते 10,000 3.08 कोटी 17.2%
- 10,000 +  1.48 कोटी 8.3%

ग्रामीण भागातील नोकर्‍या
- सरकारी – 5 टक्के
- सार्वजनिक क्षेत्र – 1 टक्के
- खाजगी क्षेत्र – 4 टक्के

ग्रामीण भारताचं वास्तव
- मोबाईल फोन असणारी कुटुंबं – 68.3 टक्के
- दुचाकी असणारी कुटुंबं – 17.43 टक्के
- कार असणारी कुटुंबं – 2 टक्के
- फ्रीज असणारी कुटुंबं – 11 टक्के

ग्रामीण भागातलं शिक्षण
- अशिक्षित – 44.5 टक्के
- पदवीधारक – 3.35 टक्के
- उच्च माध्यमिक – 5.41 टक्के
- प्राथमिक – 14 टक्के
- 35 टक्के लोकांना लिहिता वाचता येत नाही
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close