‘यूपीएससी’त मुलींची बाजी, ईरा सिंघल देशात तर अबोली नरवणे राज्यात पहिली !

July 4, 2015 3:16 PM0 commentsViews:

upsc_ira and aboli04 जुलै : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झालेत. यंदाच्या परीक्षेत पहिल्या चार क्रमांाकांवर मुलींनीच बाजी मारलीये. ईरा सिंघल हिनं यूपीएससीत देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलाय.

ईरा सिंघलसोबतच रेणू राज, निधी गुप्ता, वंदना राव यूपीएससीच्या पहिल्या चार रँकच्या मानकरी ठरल्या आहेत. तर महाराष्ट्रातून अबोली नरवणे पहिली आलीये. तर महाराष्ट्रातून 98 जणांना यंदाच्या परीक्षेत यश मिळवलंय.

देशात सर्वप्रथम आलेली ईरा सिंघल ही एमबीए आहे आणि तिनं गेल्यावर्षीच कस्टम विभागाच्या परीक्षेतही पहिली येण्याचा मान मिळवला होता. मुलाखती आणि व्यक्तिमत्व चाचणी झाल्यानंतर चार दिवसांच्या आत निकाल जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा युपीएससी परीक्षेला देशभरातनं जवळपास 9 लाख विद्यार्थी बसले होते.

युपीएससीत महाराष्ट्रातले यशस्वी कोण आहेत ?

- अबोली नरवणे – रँक – 78
- भाग्यश्री नवटाके – रँक – 125
- ओंबासे सचिन- सातारा- रँक 164
- महेश लोंढे- सोलापूर- रँक 254
- श्रीधर धुमाळ- हिवरे कुंभार- रँक 358
- राहुल कर्डिले- रँक 422
- निखारे तुषार- रँक 425
- महेश चव्हाण-रँक 449
- तुषार मोहिते- रँक 470
- मुकुल कुलकर्णी- रँक 505
- प्रवीण नलावडे – रँक 649

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close