राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांची स्टंटबाजी, कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

July 4, 2015 5:05 PM0 commentsViews:

ramesh kadam404 जुलै : मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना जोरदार स्टंटबाजी करत अटक मोर्चाचा अंक घडवून आणला. कदम यांच्यावर एका गुन्ह्या प्रकरणी आज पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त समर्थकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. या दगडफेकीत 15 ते 20 पोलीस जखमी झाले आहे.

रमेश कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांना मनोरुग्ण असल्याची टीका केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुद्द रमेश कदम यांनी गाजावाजा करत पोलीस स्टेशनवर अटक मोर्चा काढला. या मोर्चाला कदम यांच्या सांगण्यावरूनच हिंसक वळण प्राप्त झालं.

सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ शहरात असलेल्या उड्डाण पुलाखालील जाळ्या अतिक्रमण संरक्षक जाळ्या काढल्याने आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये अटक करून घेणार असल्याचे वृत्तपत्रात जाहिरात देऊन जाहीर केले आणि आज अटक मोर्चा काढला.

या मोर्चापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे हे मनोरूग्ण असून त्यांनी माझ्यावर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोपही केला. हजारो कार्यकर्त्यांसह मोर्चा पोलीस स्टेशनबाहेर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवरील गेटवर लावलेले बॅरीगेट हटवून पोलीस स्टेशनच्या आवारात प्रवेश केला. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक सुरू केली.

या दगडफेकीत पोलिसांसह काही पत्रकारही जखमी झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदार कदम यांना अटक करण्यात येणार नव्हती. त्यांना केवळ समंस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वत: होऊन अटक करवून घेण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक पाहता आमदार कदम यांनी मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आम्ही हिंसात्मक पद्धतीने आंदोलन करू असा दम माध्यमासमोर पोलीस प्रशासनाला दिला होता. त्यानंतर आमदार कदम यांनी सांगितल्याप्रमाणेच आंदोलनाला हिंसक वळण लागले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close