26/11च्या हल्ल्याच्या वेळी आर. आर. पाटील घराबाहेर पडायला तयार नव्हते – छगन भुजबळ

November 25, 2009 11:35 AM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर 26/11च्या हल्ल्याच्या वेळी विनंती करूनही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील घराबाहेर पडले नाहीत, असं उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे. 'डीएनए'या वृत्तपत्राने भुजबळांची मुलाखत छापली आहे. 'मी आर. आर. पाटील यांच्या घरी गेलो. शहरात जिथे गोळीबार सुरू आहे, तिथे जाऊ असं म्हणालो. किमान पोलीस महासंचालकांच्या ऑफिसात तरी जाऊ, असं मी त्यांना म्हणालो. पण, पोलिसांनी मला घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे, असं आर. आर. पाटील यांनी मला सांगितलं. मी जास्तच आग्रह केल्यानंतर 'तुम्ही पुढे चला, मी नंतर येतो' असं आर. आर. पाटील मला म्हणाले, असंही भुजबळ मुलाखतीत म्हणाल्याचं 'डीएनए'ने छापलं आहे. या मुलाखतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता एक नवीन वादळ उभं राहण्याची शक्यता आहे.

close