चक्क नळातून पाण्याऐवजी आले मासे !

July 4, 2015 9:10 PM0 commentsViews:

04 जुलै : मुंबई महापालिका आता नळातून पाण्याऐवजी मासेपुरवठा करत आहे असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण, हा प्रकार खरंच घडलाय. मुंबईतील मुलुंड भागात समता परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पालिकेच्या पाण्याच्या नळातून हे मासे येतायत. हा प्रकार पाहून नागरिक हैराण झाले आहेत.mulund fish3

एक दोन दिवस या माशांचं कुतूहल सर्वांना होतं. परंतु आता मात्र परिसरातील नागरिकांना उलट्या, जुलाब सुरू झाले आहेत. त्यामुळे या माशांचा धसका नागरिकांनी घेतलाय. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेचा टी वार्ड गाठले आणि याची माहिती दिली. हे मासे तलावातून आले असावेत असा साक्षात्कार पालिका कर्मचार्‍यांना झालाय आणि तसं त्यांनी नागरीकाना सांगितलं देखील. या संदर्भात विचारणा करण्यासाठी टी वार्ड गाठलं असता यावर बोलण्यास वार्ड अधिकार्‍यांनी नकार दिला. मात्र, पालिकेने या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत . हे मासे नक्की कुठून आले हे लवकरच कळेलही परंतु सध्या हे मासे मुलुंडमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close