फियानग्रस्तांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

November 25, 2009 1:32 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर फियानग्रस्त मच्छीमारांनी सरकारी यंत्रणांविरोधात बुधवारी देवगड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन आपला असंतोष व्यक्त केला. फियानग्रस्तांना मदत पोहोचविण्यात आणि बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यात सरकारने दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे बुधवारी देवगडच्या मच्छीमारांच्या संतापाचा उद्रेक झाला. सिंधुदुर्गमधल्या 13 बेपत्ता मच्छीमारांचा अजूनही शोध लागलेला नाही. आमच्या नातेवाईकांचे मृतदेह तरी निदान आमच्या ताब्यात द्यावे या मच्छीमारांच्या मागणीलाही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने देवगडमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाय सरकारने जाळ्यांसाठी मदत म्हणून जाहीर केलेल्या नुकसानभरपाईचा एक पैसाही मच्छीमारांना मिळालेला नाही. मदत मिळण्यासाठी सरकारी अधिकारी आता या मच्छीमारांना कागदपत्रांच्या जाचक अटी घालत आहेत.

close