कोस्टल रोडला बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम – अरविंद सावंत

July 5, 2015 2:21 PM1 commentViews:

Arwind Sawant on coastal

04 जुलै : मुंबईत होणार्‍या कोस्टल रोडच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडचा मूळ पर्याय हा शिवसेनेचाच असल्याचा पुनरुच्चार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

मुंबईतील कोस्टल रोडला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव दिलं जावं, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. मग त्यावर भाजपला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या, असं म्हणत कोस्टल रोडच्या मुद्द्यावर शिवसेना पाठीमागे हटणार नसल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोड प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे आदेशही काही दिवसांपूर्वी सर्व खासदारांना दिल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Prashant Gangawane

    बाळासाहेब ठाकरे नाही बाळसाहेब ठाकरे
    .
    स्मृतीशेष शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांना आदराने बाळासाहेब ठाकरे असे म्हटले जाते.
    एखाद्या व्यक्तीच्या नावासमोर साहेब लावणे हे आदराचे प्रतिक असले तरी त्यामुळे त्या व्यक्तीच्या नावाचा अपभ्रंश होऊ नये असे वाटते .

    उदा. राज ठाकरे यांना राजसाहेब ठाकरे म्हणू शकता पण ‘राजासाहेब’ ठाकरे म्हणणे योग्य नाही .

    तसेच उद्धव ठाकरे साहेबांना उद्धवसाहेब ठाकरे ऐवजी ‘उद्धवासाहेब ‘ठाकरे असे म्हणता येणार नाही .

    मराठी भाषेच्या व्याकरणाच्या नियमानुसार उगाच साहेब म्हणताना नावासमोर काना लावून अपभ्रंश करणे म्हणजे मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसणे असे झाले किंवा जाणूनबुजून चूक करून मराठीचा अपमान करणे झाले .

    तसेच ज्या व्यक्तीचे मूळ नाव बाळा असे आहे त्याच्याच नावासमोर आदराने साहेब लावून बाळासाहेब असे म्हणता येईल .

    जसे म.न से. चे माजी आमदार बाळा नांदगावकर यांचे मूळ नाव बाळा आहे त्यामुळे त्यांना बाळासाहेब नांदगावकर असे आदराने म्हणता येईल.

    त्याचबरोबर ज्याचे मूळ नावच बाळासाहेब आहे त्याला बाळासाहेब म्हणता येईल . जसे माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात .

    शिवसेना प्रमुख आणि दै. सामनाचे कालकथीत संपादक बाळ ठाकरे याचे मूळ नाव बाळ आहे. व्याकरणाच्या नियमानुसार बाळ + साहेब = बाळसाहेब …..बाळासाहेब नाही . त्यामुळे त्यांना बाळसाहेब ठाकरे असेच म्हणावे .

    त्यामुळे मराठी भाषेचा आदर होऊन व्याकरणसदृश शुद्ध मराठी भाषेत त्यांचे नाव उच्चारने अथवा लिहिणे त्यांना खरी आदरांजली होईल .

    नसते पेक्षा मराठीची तोडमोड उपेक्षा करण्यापेक्षा त्यांचे नाव दै . सामना वर असल्याप्रमाणे बाळ ठाकरे असे किंवा बाळ ठाकरेसाहेब असे उच्चारावे .

    त्यामुळे निदान महाराष्ट्रात तरी शुद्ध मराठी भाषा वापरायला प्रोत्साहन देता येईल.

    याप्रश्नी मराठी व्याकरण तज्ञांनी अडाणी राजकारणी नेत्यांस , कार्यकर्त्यांस , साहित्यिकांस, पत्रकारांस आणि जनतेस मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती ..

    ——————-डॉ. प्रशांत गंगावणे .

    अध्यक्ष : महाराष्ट्र ” वन निर्माण सेना ”

    dr.prashantgangawane@gmail.com

close