जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतोय, उद्धव ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

July 5, 2015 3:41 PM0 commentsViews:

uddhav-dsathackarey4533

05 जुलै : शिवसेना-भाजपमधील धुसफूस सुरुचं असल्याचं चित्र अजूनही दिसतं आहे. जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतं असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी नाव न घेताच आज (रविवारी) भाजपवर टीका केली. शिवसेनेकडून मराठी मुलांना उद्योगासाठी टेम्पो वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्वाभिमान संघटनेतील काही स्थानिक पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मी जनतेला शिवसेनेची सत्ता मागितली होती. मात्र, पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून वचनापासून पाठ फिरवली नाही. एक दिवस मराठी माणसाणे ठरवले तर एकहाती सत्ताही देतील. पण शिवसेना सत्तेसाठी काम करत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. वडापावच्या गाडीवरून अनेकजण सेनेवर टीका करत असतात, पण टीकाकारांना इतकंच सांगेन की, मराठी माणसाला स्वाभिमान शिवसेनेने दिला, असंही ते म्हणाले. मराठी माणूस उद्योगक्षेत्रात मागे नाही हे सर्वांना दाखवून दिलंच पाहिजे, असं आवाहनही त्यांनी तरूणांना केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close